लसीकरणात महाराष्ट्र पुन्हा अव्वल!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत उत्तमोत्तम कामगिरी करत महाराष्ट्राने लसीकरणाचा उच्चांक कायम राखला आहे. आज समोर आलेल्या आकडेवारीनुासर हे स्पष्ट होत आहे की, महाराष्ट्राने लसीकरणाच्या बाबतीतलं आपलं आघाडीचं स्थान कायम राखलं आहे. राज्यात आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ७ लाख ८५ हजार ३११ लाभार्थ्यांनी लस घेतली. ही एका दिवसातली सर्वाधिक आकडेवारी आहे.
गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाच्या बाबतीत राज्य देशात आघाडीवर आहे. एका दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्याचा विक्रम राज्याने अबाधित राखला आहे. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत राज्यात ७ लाख ८५ हजार ३११ लाभार्थ्यांनी लस घेतली. एका दिवसातली ही सर्वाधिक आकडेवारी आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली आहे.
ते म्हणाले, अजूनही लसीकरण सुरु आहे. आपण आजच्या दिवसात आठ लाखांचा आकडा नक्की पार करु. गेल्या महिन्यात २६ जून रोजी एका दिवसात ७ लाख ३८ हजार ७०४ नागरिकांच्या लसीकरणाची विक्रमी नोंद झाली होती. हा आकडा राज्याने पार केला असून आपला हा विक्रम मोडला आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत तीन कोटी ३८ लाख ५७ हजार ३७२ नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. हा देशातला आत्तापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.