गेल्या 5 वर्षात सोन्याने 56 टक्के दिला परतावा, 50 वर्षात 184 रुपयांवरुन 48 हजारांवर पोहोचले सोने
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली :
देशात सोन्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या जून तिमाहीपेक्षा यावर्षीच्या जून तिमाहीत या मागणीत 19.2 टक्के वाढ झाली आहे. जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर हीच योग्य वेळ असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. कारण येत्या काही दिवसात सोने आपल्याला योग्य परतावा देऊ शकतो.
सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक कधीही फायदेशीर आहे. गेल्या 5 वर्षाची तुलना केल्यास सोन्याने 56 टक्के परतावा दिला असून वर्षाला हे 11 टक्के आहे. 2016 मध्ये सोन्याचे भाव 10 ग्रामसाठी 31 हजार रुपये होते. परंतु, आता तेच भाव 48 हजार रुपये आहे. म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्याऱ्यांसाठी हीच योग्य वेळ असल्याचे तज्ञ सांगत आहे.
गेल्या 50 वर्षात सोन्यात 261 पटीने वाढ
भारत देशात सोन्याचे भाव दिवसेदिवस वाढतच आहे. 1970 च्या तुलनेत सध्याचे भाव 261 पटीने वाढले आहे. विशेष म्हणजे 1970 मध्ये सोन्याचे भाव 184 रुपये प्रति 10 ग्राम होते. परंतु, आता 10 ग्रामसाठी 48 हजार रुपये मोजावे लागतात.
गेल्या वर्षी 56 हजारांपर्यंत भाव
सोने गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये 56 हजार प्रति 10 ग्रामवर होते. परंतु, लसीकरणानंतर यामध्ये थोडी घट पाहायला मिळाली. मार्च 2021 मध्ये हे भाव 43 हजार रुपये असून आता 48 हजारांवर आहे.
5 वर्षात 1 लाखांपर्यंत जाऊ शकते सोने
स्पेन क्वाड्रिगा फंडच्या मते, पुढील 3 ते 5 वर्षात त्याची किंमत 3,000 ते 5000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच भारतीय भाषेत याची किंमत 78,690 ते 1,31,140 रुपये प्रति 10 ग्रॅम होईल. तर दुसरीकडे, IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी अँड करन्सी) अनुज गुप्ता सांगतात की, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठी खीळ बसली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था प्रगतीपथावर येण्यासाठी वेळ लागेल. या कारणास्तव सोने आपल्यासाठी फायदेशीर ठरत असून त्याचे भाव एका वर्षात 60 हजारांवर जाईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.