“तू मी आणि पुरणपोळी”, ओम स्वीटूची लव्हस्टोरी चित्रपट रुपात
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
सुखाचं-हक्काचं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. असं घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते. अशावेळी सासूच जर तिची सखी झाली तर नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो. आणि घराचं गोकुळ होतं. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
रसिकप्रेक्षकांनी मालिकेला आणि त्यातील नलू मावशी, दादा, चिन्या, शकू मावशी, मालविका, रॉकी या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर या नव्या जोडीने तरुणाईवर छाप सोडलेय. प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्यासोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताना दिसत आहे.
आता याचाच पुढचा टप्पा “तू मी आणि पुरणपोळी” १६ मे रोजी चित्रपट रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता काय असणार या “तू मी आणि पुरणपोळी”मध्ये हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.