किश्तवाडमध्ये ढगफुटी, 40 बेपत्ता चौघांचा मृत्यू
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली आहे. यात 36 जण बेपत्ता असून चौघांचा मृत्यू झाला आहे. किश्तवाडमधील होजार गावात ढिगाऱ्याखाली चार मृतदेह आढळले असून 8 ते 9 घरांचे नुकसान झाले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी टि्वट करून 30 ते 40 जण बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये जोरदार पाऊस सुरू असून संपर्कसेवा ठप्प झाली आहे. राज्यातील किश्वतवाडमध्ये ढगफुटी झाल्याने जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालांकडून परिस्थिती माहिती करून घेतल्याचे गृह मंत्री अमित शाह यांनी टि्वट करून सांगितले. तसेच त्यांनी पीडित कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केली. जम्मूत गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. जुलैच्या शेवट्या आठवड्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. यानुसार किश्तवारमधील तलावाच्या काठावरील लोकांना सर्तक राहण्याची सूचना देण्यात आली होती. येत्या काही दिवसातही हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे नदी-नाल्यांचे जलस्तर वाढू शकते.
देशातील इतर भागांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे 200 पेक्षा जास्त लोकांना मृत्यू झाला आहे. तर बिहारमध्ये परिस्थिती बिघडली असून महापूर आला आहे. तर हिमाचलमध्येही ढगफुटी झाली असून लाहौल-स्पीतिमध्ये 10 जण बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. तर किन्नौरच्या रकच्छम गावातील नदीला पूर आल्याने भंयकर परिस्थिती निर्माण झाली आहे.