भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू, 27 जखमी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
बाराबंकी : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात आज, गुरुवारी पहाटे ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्स यांच्यात भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. तर 27 जण जखमी झाले आहेत. हा अपघात बाराबंकी शहरापासून वीस किलोमीटर दूर देवा पोलीस स्टेशन परिसरातील रोडवर झाला.
यासंदर्भातील माहितीनुसार दिल्लीहून बहराईचकडे जाणाऱ्या ट्रकने बाराबंकी नजीक चुकीच्या बाजूने वाहन दामटक समोरून येणाऱ्या वॉल्वो बसला धडक दिली. या अपघातात बस मधील
9 प्रवासी मृत्यूमुखी पडले असून 27 जण जखमी झाले आहे. त्यातील 5 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी लखनऊला पाठवण्यात आलेय. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतकांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केलीय. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाराबंकी येथे झालेल्या अपघातातील मृतांबद्दल शोक व्यक्त केला. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.