भारतात 24 तासात 80,834 नवे कोरोना रुग्ण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली, : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 80,834 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 3,303 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 1,32,062 नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे 2,94,39,989 रुग्ण झाले असून एकूण 2,80,43,446 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 10,26,159 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 3,70,384 आहे.
आतापर्यंत देशात 25,31,95,048 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.