कोविडचा तिसरा डोस घेणे गरजेचे - डॉ. अँथनी फाऊची
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : लसीचा प्रभाव कमी होऊन पुन्हा कोविड संसर्ग होण्याची शक्यता असल्याने कोविड लसीचा तिसरा डोस घेणे गरजेचे असल्याचे मत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी तिसरा डोस घेतल्यानंतर कोविड संसर्गाचा धोका कमी असल्याची आकडेवारीही सादर केली.
ते म्हणाले की, दोन डोस घेतल्यानंतरही कोविडचा संसर्ग होण्याचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. यामुळे तिसरा बुस्टर डोस घेणे गरजेचे आहे. तिस-या डोसमुळे कदाचित हा धोका टाळता येवू शकतो असे त्यांनी सांगितले.
दरम्यान अमेरिकेत २० सप्टेंबरपासून नागरिकांना तिसरा डोस देण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी तेथे सुरु करण्यात आली आहे. फायझर आणि मॉडर्ना लसीचा तिसरा डोस पूर्ण झाल्यानंतर आठ महिन्यांनी तिसरा डोस दिला जाणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय एफडीएद्वारे घेण्यात येणार आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत जवळपास साडेसहा लाख लोकांचा मृत्य़ू झाला आहे.