करोनाबाधितांच्या ने-आणीसाठी भाजपतर्फे वाहन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
रत्नागिरी, ३ मे, (हिं. स.) : भारतीय जनता पार्टीच्या राजापूर शाखेने रायपाटण कोविड केंद्रावर रुग्णांना ने-आण करण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले आहे.
भाजपचे प्रदेश सचिव नीलेश यांच्या आदेशानुसार रुग्णांना ने-आण करण्यासाठी चारचाकी वाहन समीर खानविलकर यांनी उपलब्ध करून दिले. सध्या करोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण राज्यभर लॉकडाउन असल्याने आणि अनेक ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळत असल्याने त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरवर नेआण करण्यासाठी शासनाची वाहने कमी पडत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने हकनाक आपला जीव गमवावा लागत आहे.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन लोकांचे हाल कमी कसे करता येतील, यादृष्टीने विचार करून नीलेश राणे यांच्या आदेशानुसार समीर खानविलकर यांनी स्वत:ची टाटा सुमो गाडी रुग्णांसाठी उपलब्ध केली आहे. ज्या रुग्णांना रायपाटण कोविड सेंटरवर जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत नसेल, त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आज ही सुविधा सुरू झाली. त्यावेळी भाजपचे राजापूर तालुकाध्यक्ष अभिजित यशवंत गुरव, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, समीर खानविलकर, प्रसाद देसाई, सिद्धार्थ जाधव, मनोज गांगण, तुषार पाचलकर आणि प्रमोद मांडवकर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.वाहन आवश्यक असल्यास 7083702666, 8975039119, 9372285095 किंवा 7588808075 या मोबाइलवर संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.