कोरोना मृतकांच्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत- केजरीवाल
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनामुळे कुणाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची
मदत देण्यात येईल. तसेच एखाद्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे कोरोनामुळे निधन झाल्यास त्या विद्यार्थ्याला
वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत 2500 रुपये मासिक पेन्शन आणि निःशुल्क शिक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल यांनी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी
संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील घोषणा केली. “करोनामुळे सदस्य गमावलेल्या प्रत्येक कुटुंबाला 50 हजार
रुपयांचा मदतनिधी दिला जाईल. त्यासोबतच, ज्या कुटुंबांमध्ये कमावत्या व्यक्तीचं निधन झाले आहे, त्या
कुटुंबाला 50 हजार रुपये मदतनिधीसोबतच महिना 2500 रुपये पेन्शन स्वरूपात दिले जातील. यामध्ये जर पतीचं
निधन झालं असेल, तर ही पेन्शन पत्नीला मिळेल. जर पत्नीचे निधन झाले असेल, तर पेन्शन पतीला मिळेल.
जर एखाद्या अविवाहित व्यक्तीचे निधन झाल्यास ही पेन्शन पालकांना मिळेल असे केजरीवाल यांनी
सांगितले.ज्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचे करोनामुळे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांच्या पूर्ण शिक्षणाचा
खर्च दिल्ली सरकार उचलणार असल्याचं केजरीवाल यांनी यावेळी जाहीर केले.