‘माझा होशील ना’मध्ये रंजक  वळण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘माझा होशील ना’मध्ये रंजक  वळण

माझा होशील ना’ या मालिकेतील सई आदित्यच्या जीवनात दररोज काही ना काही घडामोडी
घडत आहेत आणि ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. मालिका इरसाल ब्रह्मे
मामा आणि सई-आदित्यचं प्रेम यामुळे चांगलीच लोकप्रिय आहे. लग्नानंतर सई आता तिच्या
चार सासऱ्यांसोबत, एका आज्जेसासऱ्यासोबत आणि नवरोबा आदित्यसोबत मजेत राहू
लागलीये. आता तर तिने ब्रह्मे घराला गुलप्रीतच्या रुपात नवीन सुनबाईही मिळवून दिलीये.
पण या साऱ्या घटनांच्यामधे सई-आदित्यला स्वत:साठी वेळच काढता येत नाहिये. त्यामुळेच या
रविवारी दोघांनी सिनेमाला जायचा प्लान केलाय! आदित्यने सईसाठी हा खास सिनेमाचा बेत
आखलाय.

सई-आदित्य मिळून एका आटपाट नगरीच्या निरागस राजकुमाराची आणि बिनधास्त
राजकुमारीची गोष्ट पाहणार आहेत आणि आजवर न झालेले अनेक खुलासे या सिनेमाच्या
निमित्ताने होणार आहेत. तेव्हा या रविवारी हा दोन तासाचा खास भाग दाखवला जाणार आहे.