आधी भाजपाचा जल्लोष, मग अवघ्या १० मिनिटात निकाल फिरला; नागपूर पोटनिवडणुकीत काँग्रेस अव्वल
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नागपूर : नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारलीय. नागपूरमधील १६ जागांपैकी काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवत ग्रामीण नागपूरवर आपला दबदबा दाखवून दिलाय. यानंतर ३ जागांसह भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर २ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे नागपूरमधील दवलामोटी गणाच्या मतमोजणीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अवघ्या १० मिनिटात आधी घोषित निकाल बदलल्याचं दिसलं. दवलामोटी मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना आधी भाजपाच्या ममता जैस्वाल यांच्या विजयाची बातमी आली. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, हा आनंद केवळ १० मिनिटांचा ठरला. त्यानंतर लगेचच मतांची पुन्हा मोजणी झाली आणि काँग्रेसच्या सुलोचना ढोक यांनी १० मतांनी विजय मिळवला.
नेमकं काय झालं?
दवलामोटी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असताना आधी भाजपाच्या ममता जैस्वाल यांच्या विजयाची बातमी आली. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, लगेच १० मिनिटांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपसह काँग्रेसच्या उमेदवाराला बोलावून त्यांच्यासमक्ष फेरमतमोजणी केली. यावेळी काँग्रेसच्या सुलोचना ढोक यांनी १० मतांनी विजय मिळवला. यानंतर सुलोचना ढोक यांनी भाजपच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर स्वतः निकाल घोषित करत जल्लोष केल्याचा आरोप केला.