बी. एस. येडियुरप्पा यांनी केली राजीनाम्याची घोषणा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
बंगलोर : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत अत्यंत उत्कंठावर्धक राजकीय घटनाक्रमानंतर अखेर बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले. कर्नाटकच्या भाजप सरकारच्या द्वी-वर्ष पूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात भावुक होऊन बी. एस. येडियुरप्पा यांनी आपला निर्णय नागरिकांपुढे मांडला. यावेळी बोलताना बी. एस. येडियुरप्पा यांनी जुन्या आठवणी जागवत अटल बिहारी वाजपेयी, लाल कृष्ण अडवाणी आणि इतर राष्ट्रीय नेत्यांचा उल्लेख केला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचे आभार मानले.
कार्यक्रमात बोलताना बी. एस. येडियुरप्पा म्हणाले की, सत्तर वर्ष पूर्ण केल्यानंतरही भाजप नेतृत्वाने मला राज्यात कार्य करण्याची संधी दिली त्यासाठी त्यांचा आभारी आणि ऋणी आहे तसेच पक्षाला राज्यात बळकट करण्यासाठी निरंतर कार्य करीन असे ते म्हणाले. राजीनामा देताना दु:ख नाही तर संतोष आणि समाधान असून भोजनानंतर राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द करील असे त्यांनी जाहीर केले. बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे कर्नाटकमध्ये नेतृत्व बलावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविषयी कथित नेतृत्व बदलावर राज्यात विविध चर्चा सुरु आहेत. अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी तसेच अनेक राजकीय नेत्यांनी पक्षापलीकडे जाऊन बी एस येडियुरप्पा यांनी खुला पाठिंबा जाहीर करीत अप्रत्यक्ष शक्ती प्रदर्शन सुरु केले आहे. काही दिवसांपूर्वी बी एस येडियुरप्पा म्हणाले होते की, राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जे काही करायला सांगतील ते मी पालन करील. भाजपला पुन्हा राज्यात सत्तेत आणणे माझे कर्तव्य आहे.बी. एस. येडियुरप्पा यांच्यानंतर कर्नाटकाचे नेतृत्व कोणाकडे याकडे लक्ष लागले आहे
2018 विधानसभा निवडणूकीत साली बहुमत नसतानाही काँग्रेस- जेडीएसने निवडणूकीनंतर भाजपला रोखण्यासाठी युती केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस- जेडीएसच्या 17 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस- जेडीएसचे कुमारस्वामी आघाडी सरकार संकटात आले होते. तत्कालीन कर्नाटक विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी काँग्रेस- जेडीएसच्या एकूण 17 आमदारांना अयोग्य घोषित केले होते त्यानंतर बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
2019 साली जुलै महिन्यात काँग्रेस- जेडीएसच्या एकूण 17 बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस- जेडीएसचे आघाडी सरकार कोसळून राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला होता. काँग्रेस- जेडीसच्या आघाडी सरकारचा पराभव केल्यानंतर बी. एस. येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर आवाजी मतदानाद्वारे कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध केले होते.
2018 साली विधानसभा निवडणुकीतनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केली होती मात्र बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे येडियुरप्पा काहीच दिवसात राजीनामा दिला होता. 2018 साली झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला 105 जागा मिळवून देण्यात बी. एस. येडियुरप्पा यांनी मोलाची कामगिरी बजाविली होती. तसेच 2019 लोकसभा निवडणुकीत 28 पैकी 26 जागांवर मिळालेल्या विजयामागे येडियुरप्पा यांचे विशेष प्रयत्न होते.