अभिनेता करण मेहराची पत्नी अभिनेत्री निशा रावल ‘बिग बॉस’15 मध्ये सहभागी होणार?
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अभिनेत्री निशा रावल सध्या तिच्या आणि पती करण मेहरा मध्ये सुरू असलेल्या वादामुळे चांगलीच चर्चेत आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात एक कठीण प्रसंग ओढवला असून ते आता घटस्फोटासाठी आणि त्यांच्या मुलाच्या कस्टडीसाठी कायदेशीर रित्या लढत आहेत. यात आता निशा रावलने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
निशा रावलने ‘स्पॉट बॉय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की तिची टीम बिग बॉसच्या निर्मात्यांशी बोलत आहे.मात्र निर्मात्यांनी अजून काही निर्णय घेतला नसल्याचे तिने सांगितले. ‘बिग बॉस’१५ साठीबऱ्याच प्रमाणात क्रेझ आहे. शो चे निर्मात्यांची बऱ्याच कलाकारांशी बोलणं सुरु असून महिन्या अखेरी आपल्याला कन्फर्म लिस्ट कळेल. १५ व्या सीझनसाठी अर्जुन बिजलानी, अनुशा दांडेकर, निधी भानुशाली, प्रिया बॅनर्जी सारख्या बऱ्याच कलाकारांची नावे विचाराधीन आहेत . आणि आता अभिनेत्री निशा रावल बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा पूर्ण होणार का ? आता बिग बॉसच्या घरात निशा दिसणार का ? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
बिग बॉस ओटोटीचा प्रिमियर येत्या ८ ऑगस्ट रोजी डिजिटल प्लेटफॉर्म वूट वर होणार आहे. सुरवातीचे सहा आठवडे बिग बॉस ओटीटीवर करण जोहर होस्ट करताना दिसून येणार आहे. बिग बॉस ओटीटीवर एपिसोड रिलीज केल्यानंतर बिग बॉस १५ पुन्हा त्याच्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच कलर्स चॅनलवर दिसणार आहे.
दरम्यान निशा रावल निर्माते शशी-सुमित यांची आगामी मालिका ‘मित’मध्ये काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. निशाने लोकप्रिय अभिनेता करण मेहराशी लग्न केले असून सध्या त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामुळे ते वेगळे राहत आहेत. करणने ‘ये रिश्ता क्या कहलता हैं’ मध्ये नैतीकची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने ‘बिग बॉस’च्या १० व्या सीजनमध्ये सहभाग घेतला होता.