मुंबईत स्वाईन फ्लूचा धोका; कोरोना सारखीच लक्षणे
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे एच१एन१ म्हणजेच स्वाईन फ्लूचे रूग्ण मुंबईत आढळून येत आहेत. स्वाईन फ्लू हा आजार इन्फ्ल्युएंझा एच१एन१ या विषाणूपासून होत असून सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखी ही आजाराचीही लक्षणे आहेत.
कोरोनासारखीच या आजाराचीही लक्षणे असल्याने संसर्ग रोखण्यासाठीही मास्कचा वापर गरजेचा आहे. कोरोनावर अजूनही ठोस औषध नसले तरी स्वाईन फ्लूवर औषध आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.