3.48 लाख शिवभोजन थाळीचे मोफत वितरण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
परभणी :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जाहीर आर्थिक मदतीच्या अनुषंगाने 15 एप्रिलपासुन गरीब व गरजू लोकांची जेवणाअभावी हालअपेष्टा सहन करावी लागू नये यासाठी मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 15 एप्रिल ते 23 ऑगस्टपर्यंत प्रतिदिन इष्टांकात दीडपट वाढ करुन प्रतिदिन 3 लाख 48 हजार 329 शिवभोजन थाळीचे जिल्ह्यात मोफत वितरण करण्यात आले आहे.अशी माहिती परभणीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा यांनी दिली.
शिवभोजन योजनेअंतर्गत परभणी तालुक्यातील 12 केंद्रावर 1 हजार 725 प्रतिदिन थाळी तर दीडपट वाढीव थाळी संख्या 2 हजार 588 आहे.जिल्ह्यातील मंजूर व दीड पटवाढीव थाळ्यांचा तपशिल आहे. राज्यामध्ये शिवभोजन योजनेअंतर्गत दि.15 एप्रिल ते 23 ऑगस्ट 2021 पर्यंत 2 कोटी 43 हजार 230 शिवभोजन थाळीचे संपुर्ण राज्यात मोफत वितरण करण्यात आले आहे. असेही कळविण्यात आले आहे.