सासऱ्यांची प्रकृती स्थिरावल्यानंतर दीपिका कक्करने साजरा केला वाढदिवस
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्कर टीव्ही क्षेत्रातील सुप्रसिद्ध चेहरा आहे. नुकतंच ती ३५ वर्षाची झाली आहे. यंदाचा वाढदिवस तिने आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा केलाय. कुटुंबीयांसोबत सेलिब्रेशनचे काही फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने पती शोएब इब्राहिमसोबत स्पेशल डे असल्याचं सांगितलं आहे.
‘ससुराल सिमर का’ मालिकेतील आदर्श सून म्हणून ‘सिमर’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका कक्कर हिला अनेक जण छोट्या पडद्यावर अगदी साध्या, सालस रुपात पाहतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दीपिका कक्कर खऱ्या आयुष्यात ही सिमर बहूसारखीच आहे. मग नातं टिकवायचं असो की आदर दाखवायचा असो दीपिका प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण आहे. मालिकेत सिमर बहू ज्याप्रमाणे संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी सांभाळते, त्याचप्रमाणे दीपिका आपल्या खऱ्या जीवनात आणि वैयक्तिक आयुष्यातही समान संतुलन राखते. याचं उत्तम उदाहरण तिच्या वाढदिवशीच पहायला मिळालं.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका कक्कर हिचे सासरे म्हणजेच पती शोएब इब्राहिमच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोकमुळे रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यामूळे त्यांच्या तब्बेतीसाठी अभिनेत्री दीपिका कक्करचे संपूर्ण कुटूंबच चिंतेत होतं. अशात तिचा वाढदिवस देखील आला होता. काल म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस होता. परंतू सासऱ्यांची प्रकृती स्थिरावत नाही तोपर्यंत तिने आपला वाढदिवस देखील साजरा केला नाही. अखेर आज तिच्या सासऱ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं पाहून हा आनंद आणखी द्विगुणीत करण्यासाठी तिने आपला वाढदिवस आज कुटुंबीयांसोबत साजरा केलाय. याचे काही फोटोज शोएबने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.