राज्यातील मंदिरं उघडा; पुरोहितांचं मुख्यमंत्र्यांना साकडं
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
पुणे : महाराष्टातील मंदिरे कोरोना महामारीमुळे गेली अठरा महिने बंद आहेत. तसेच सर्व प्रकारे धार्मिक कार्यक्रम देखील बंद आहेत. त्यामुळे राज्यातील पुरोहित वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. यासाठी पुरोहितांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी व मंदिरे लवकर खुली करावीत अशी मागणी अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभाचे पुणे विभाग मंत्री वेदमुर्ती मधुकरशास्त्री गवांदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन पाठवून त्यांनी ही मागणी केली आहे. गेल्या अठरा महिन्यांपासून संपूर्ण मंदिरं बंद आहेत. या लॉकडाऊन काळात आपण दुकाने, नोकरवर्ग, छोटे मोठे व्यवसाईक अशा घटकास व्यवसायासाठी निर्बंध टाकून मुभा दिल्या आहेत. परंतु महाराष्ट्रातील गावोगावी असलेली मंदिरं उघडण्यास तसेच दर्शनासाठी, धार्मिक विधी करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे भाविक मंदिरास दर्शनासाठी व धार्मिक विधीसाठी येऊ शकत नाहीत.