वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हा परिषदेत ढोल वजाव आंदोलन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
अहमदनगर: जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग पाथर्डीचे प्रभारी उपअभियंता व शाखा अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करावे या मागणी साठी वंचित बहु जन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेमध्ये ढोल बजाव आंदोलन करण्यातआले.
शासकीय योजनेअंतर्गत १० लाख रकमेचे पागोरी पिंपळगाव ते सोमठाणे रस्ता डांबरी दुरुस्ती करणे असे काम मंजूर होते.सदरचे काम जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांच्या अंतर्गत करण्यात येत होते व त्यासाठी कामाचा ठेका देण्यात आलेला होता परंतु सदरचे डांबरी रस्ता दुरुस्तीचे काम न करता प्रभारी उपअभियंता व शाखा अभियंता यांनी कागदोपत्री झाल्याचे भासून खोटे मोजमाप पुस्तक क्र. ४३५८ मध्ये लिहिले व खोटे देयक तयार करून शासनाची १० लाख रुपयांची रक्कम अपहार करण्याचा प्रयत्न केलेला आहे.मोजमाप पुस्तक मधील प्रत्यक्षात काम झाले नसतानाही खोटे मोजमापे लिहिले असून ती मोजमापे बरोबर आहे यास दुजोरा देणारी तपासणीची स्वाक्षरी कार्यकारी अभियंता यांनी केली आहे.