सौदी अरेबिया विमानतळावर ड्रोन हल्ला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सौदी अरेबिया विमानतळावर ड्रोन हल्ला

सौदी : सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोन हल्ल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात आठ लोक जखमी झाले आहेत आणि एका नागरी विमानाचे नुकसान झाले, असे सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. गेल्या २४ तासांत आभा विमानतळावर हा दुसरा ड्रोन हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

यापूर्वी विमानतळावरील हल्ल्यात कोणीही जखमी झाले नव्हते. येमेनमधील इराण समर्थित शिया बंडखोरांशी लढणाऱ्या सौदी नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. या हल्ल्यात किती लोक जखमी झाले याचीही माहिती देण्यात आलेली नाही.

२०१५ पासून, सौदीच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीशी लढणाऱ्या येमेनच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियातील लष्करी कार्यालये आणि गंभीर पायाभूत सुविधांसह आंतरराष्ट्रीय विमानतळांना लक्ष्य केले आहे.

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये येमेनच्या हुथी बंडखोरांनी दक्षिण -पश्चिम सौदी अरेबियामधील आभा आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य केले होते आणि तेथे उभ्या असलेल्या एका प्रवासी विमानाला आग लागली होती

अल अखबरिया टीव्हीच्या वृत्तानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सौदीच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीचे प्रवक्ते कर्नल तुर्की अल-मलिकी म्हणाले की, सौदी अरेबियाला हुथींनी पाठवलेले दोन बॉम्बयुक्त ड्रोन नष्ट केले. सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील भागात सामान्य माणसाला लक्ष्य करण्याचा हा मुद्दाम केलेला प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.