ई-कॉमर्समध्ये अनुचित व्यापार पद्धती रोखण्याकरिता महत्वाचे पाऊल
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) नियम, 2020 हा 23 जुलै, 2020 रोजी अधिसूचित करण्यात आला. ई-कॉमर्समधील अनुचित व्यापार पद्धती रोखण्याकरिता नियामक आराखड्यास आणखी बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने नियमातील प्रस्तावित सुधारणांबाबत ग्राहक व्यवहार विभागाच्या संकेतस्थळावर मत / टिप्पण्या / सूचना मागविल्या आहेत.
प्रस्तावित सुधारणांमध्ये झटपट विक्रीशी (Flash sales फ्लॅश सेल ) संबंधित तरतुदींचा समावेश आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.