क्वीन विशाखा सुभेदारला राज्यपालांच्या हस्ते 'स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
आपल्या दमदार कॉमेडी अंदाजाच्या जोरावर अभिनेत्री विशाखा सुभेदारनं सगळ्यांना पोटधरुन हसवलं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सध्या विशाखा एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. तीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे.
विशाखा सुभेदारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे 'स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. पुणे येथील सुर्यदत्त समुह शिक्षण संस्थेतर्फे राजभवन येथे रविवारी आयोजित एका कार्यक्रमात सुर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आले. यावेळी 11 गुणवंत महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात विशाखा सह बॉलिवुड अभिनेत्री उर्वशी रौतेला, निशिगंधा वाड, कविता राऊत, गायिका पलक मुच्छल यांचा ही समावेश आहे.
मंडळी हे प्रेम आहे तुम्हा सर्वांच, ज्यामुळे मी माझं काम जबाबदारीने पार पाडण्याचा कायम प्रयत्न करत असते. असंच प्रेम कलाकारावर राहू द्या आणि सूर्यदत्त चे संस्थापक ह्यांचे देखील आभार आणि सगळ्यात महत्वाचे माझ्या देवाचे आभार, असं विशाखा म्हणाली.
दरम्यान, हा पुरस्कार मला माझ्या कामासाठी मिळालाय आणि त्याकरिता काही मंडळी अतिशय महत्वाची आहेत ज्यांच्याशिवाय माझं काम अधुरं राहील असतं. आमची टीम 'हास्यजत्रा 'सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे, माझा पार्टनर, मित्र समीर चौघुले आणि प्रसाद खांडकेकर, नम्रता योगेश संभेराव, पॅडी कांबळे आणि सोनी मराठीचे मनापासून आभार.