मुनमुन दत्ता विरोधात मुंबईत गुन्हा दाखल
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबीता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चर्चा मुनमुनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जातीवाचक शब्दाचा उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सुरु झाल्या होत्या. हे वक्तव्य मुनमुनला आता महागात पडले आहे. मुनमुन विरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिडीओमध्ये मुनमुनने जातीवाचक शब्दाचा उल्लेख केल्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे मुनमुन दत्ता विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी हरियाणामधील हांसी शरहात मुनमुनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘नॅशनल अलायंल फॉर दलित ह्यूमन राईटस’चे कार्यकर्ते रतज कलसन यांनी मुनमुन विरोधात गुन्हा दाखल केला होता. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मुनमुनवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मुंबईत देखील मुनमुन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.