राज्यांना देण्यात आल्या 57 कोटींहून अधिक कोरोना लसी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : भारत सरकारकडून (मोफत पुरवठा मार्गाने) आणि थेट राज्यांकडून खरेदीच्या मार्गाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत एकूण 57 कोटी 5 लाखांहून अधिक (57,05,07,750) मात्रांचा पुरवठा करण्यात आला आहे आणि आणखी 13,34,620 मात्रांचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे कोविड प्रतिबंधक लसीच्या 3 कोटी 44 लाखांहून अधिक (3,44,06,720) मात्रा अजूनही शिल्लक असून यापुढील काळातील लसीकरणासाठी त्या उपलब्ध आहेत.