माजी आयएएस हर्ष मंदर यांच्या घर, कार्यालयावर ‘ईडी’ची छापेमारी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

माजी आयएएस हर्ष मंदर यांच्या घर, कार्यालयावर ‘ईडी’ची छापेमारी

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरूवारी नवी दिल्लीत सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आणि कार्यकर्ते हर्ष मंदर यांच्या घर व कार्यालयावर आज छापेमारी केली. सुत्रांनी सांगितले की, मंदर हे पत्नीसह जर्मनीला रवाना झाल्याच्या काही तासानंतर ही छापेमारी करण्यात आली.

ही छापेमारी आज सकाळी आठ वाजता वसंत कुंज येथील त्यांच्या निवासस्थानी आणि अधचिनीमधील सेंटर फॉर इक्विटी स्टडीज येथील त्यांच्या कार्यलयात सुरू झाली. याशिवाय सुत्रांनी इंडिय एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार ईडीने महरौलीमध्ये मंदर हे चालवत असलेल्या एका बाल गृहावर देखील छापा मारला होता.

गुरूवारी पहाटे मंदर हे बर्लिनमध्ये रॉबर्ट बॉश अकादमी येथे फेलेशिपसाठी जर्मनीला रवाना झाले. ते सेंटर फॉर इक्विटी स्टडीजचे संचालक म्हणून कार्य करत आहेत.

जुलै महिन्यात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने(एनसीपीसीआर) दिल्ली उच्च न्यायालयाता सांगितले होते की, मंदर यांच्याशी निगडित असलेल्या दोन बाल गृहांच्या विरोधात विविध बाबींचे उल्लंघन आणि विसंगती आढळल्यानंतर कारवाईच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. एनसीपीसीआरने न्यायालयाला दिलेल्या जबाबात नमूद केलेल्या उल्लंघनांपैकी एक म्हणजे त्यांना मुलांनी जंतर -मंतरसह निषेध स्थळांवर नेण्यात आल्याची माहिती दिली.

एनसीपीसीआरच्या तपासणी अहवालाला रद्द करण्यासाठी सेंटर फॉर इक्विटी स्टडीज (सीईएस) द्वारे चालवल्या जाणाऱ्या दोन बाल गृहांनी दाखल केलेल्या याचिकेच्या उत्तरात हे उत्तर सादर करण्यात आले होते.