नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 40 हजार 51 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 20 हजार 693 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 5 हजार 276 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 4 हजार 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक 1 हजार 658, बागलाण 582, चांदवड 639, देवळा 608, दिंडोरी 845, इगतपुरी 213, कळवण 511, मालेगाव 346, नांदगाव 297, निफाड 1 हजार 42, पेठ 84, सिन्नर 1 हजार 61, सुरगाणा 245, त्र्यंबकेश्वर 161, येवला 195 असे एकूण 8 हजार 487 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 10 हजार 733, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 1 हजार 338 तर जिल्ह्याबाहेरील 135 असे एकूण 20 हजार 693 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 3 लाख 64 हजार 748 रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे 92.21 टक्के, नाशिक शहरात 94.19 टक्के, मालेगाव मध्ये 86.55 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 95.39 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 93.23 इतके आहे.