पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले नफ्ताली बेनेट यांचे अभिनंदन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान झाल्याबद्दल नफ्ताली बेनेट यांचे अभिनंदन केले. ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, इस्रायलचे पंतप्रधान झाल्याबद्दल महामहिम नफ्ताली बेनेट यांचे अभिनंदन. पुढच्या वर्षी, दोन्ही देशांमधल्या दृढ राजनैतिक-सामरिक संबंधाची 30 वर्षे आपण साजरी करणार आहोत, आपल्या भेटीची आणि उभय देशातली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आपण उत्सुक आहोत. "
मावळते पंतप्रधान बेन्जामिन नेत्यनाहू त्यांच्या नेतृत्वाबद्दल आणि भारत- इस्रायल धोरणात्मक भागीदारीप्रती वैयक्तिकरित्या लक्ष पुरवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. इस्रायलचे पंतप्रधान म्हणून यशस्वी कारकिर्दीसाठी आपल्या नेतृत्वाबद्दल आणि भारत- इस्रायल धोरणात्मक भागीदारीप्रती वैयक्तिकरित्या लक्ष पुरवल्याबद्दल आभार असे पंतप्रधान मोदी म्हणाले.