तमिळनाडू भाजप आमदारांनी घेतली किशन रेड्डींची भेट
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत तमिळनाडूच्या भाजप आमदारांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि सिकंदराबादचे खासदार गंगापूरम किशन रेड्डी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मान्यवरांनी गंगापूरम किशन रेड्डी यांचा पारंपरिक पद्धतीने आदर सत्कार केला. उपस्थित मान्यवरांनी तमिळनाडू तसेच अन्य विषयांवर मुखकवच आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत चर्चा केली.
याप्रसंगी तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ लोकनाथन मुरुगन , भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वानाथी श्रीनिवासन, नैनार नागेंद्रनाथन, एम आर गांधी, सी के सरस्वती आणि सहप्रभारी पोंगुलेटी सुधाकर रेड्डी हजर होते. गंगापूरम किशन रेड्डी तसेच जनरल व्ही के सिंह यांच्याकडे तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून जबाबदारी होती.
भाजप आमदारांनी शनिवारी ३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सदिच्छा भेट घेतली होती. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपने चार जागा जिंकल्या आहे. यात भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वानाथी श्रीनिवासन यांचाही समावेश आहे.