विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व कोण करणार?
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
बंगाल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी सध्या दिल्ली मुक्कामी आहे. ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं केंद्र असलेल्या दिल्लीनं सगळ्यांचीच त्यांच्यावर नजर आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांची भेट घेतलीच. पण, त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्याचबरोबर इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याही त्या भेटीगाठी घेत आहेत. ममता यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी त्यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे आक्रमक भाजपाविरोधात आक्रमक असलेल्या ममता यांच्याकडे विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व जाऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर आता ममता बॅनर्जी यांनीच भूमिका मांडली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्लीत असून, काल (२७ जुलै) त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी कांग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. आजही (२८ जुलै) त्यांनी काही पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. आपल्या दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पेगॅसस हेरगिरी प्रकरणावर चिंता व्यक्त केली. देशातील सध्याची परिस्थिती आणीबाणीपेक्षाही गंभीर असल्याचा दावा त्यांनी केला. ममता म्हणाल्या,”पेगॅसस काय आहे? हा व्हायरस आहे. आपली सुरक्षा धोक्यात आहे. कुणालाही स्वातंत्र्य राहिलेलं नाही. माझा फोन हॅक करण्यात आला. अभिषेक बॅनर्जी यांचा फोन हॅक करण्यात आला; इतकंच नाही, तर प्रशांत किशोर यांचाही. तुम्ही जर एक फोन हॅक करत असाल, तुम्ही अनेकाचे फोन हॅक करू शकता. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. याची चौकशी व्हावी. कोणताही मुद्दा उचलला की ते दुर्लक्ष करतात, पण यालाही काही मर्यादा आहेत”, असं ममता म्हणाल्या.