जहाज नदीत उलटून ५१ जणांचा मृत्यू तर ६० जण बेपत्ता
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो देशातील कांगो नदीत जहाज उलटून ५१ लोकांचा मृत्यू झाला. तर ६० हून अधिक जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. सद्यपरिस्थितीत बचाव दलाचे कार्य युद्धपातळीवर सुरु असून आतापर्यंत ३९ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांगो नदीतून प्रवास करणा-या या अपघातग्रस्त जहाजात क्षमतेपेक्षा अधिक नागरिक प्रवास करत असल्याची बाब समोर आली आहे. तसेच प्रवाशांची मोजणी करण्यात आली नसल्यामुळे प्रवासी संख्येचा अंदाज लावता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान यापूर्वीही जानेवारीमध्ये किवू तलावात प्रवासी बोट बुडून तीन लोकांचा मृत्यू झाला होता. तर २०२० मध्ये बोट पलटून १० जणांचा मृत्यू झाला होता.
हिंदुस्थान समाचार