जेईई मेन पेपर-2 चे निकाल जाहीर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजेंसीकडून जेईई मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षेच्या पेपर दोनचा निकाल जाहीर पेपर 2 चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार आपला निकाल jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करु शकतात. हा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना आपला अॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख टाकावी लागणार आहे. जवळपास 60 हजार विद्यार्थ्यांसाठी जेईई मेन बी.आर्क आणि बी.प्लानिंगचे निकाल घोषित केले आहे. एनटीएकडून बीटेकचे निकाल आधीच जाहीर करण्यात आले आहेत.
यावर्षीपासून संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई-मेन्स परीक्षा वर्षातून चार वेळा आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना आपल्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळू शकेल. पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा मार्चमध्ये आयोजित करण्यात आला होता.पु ढील टप्प्यातील परीक्षा एप्रिल आणि मेमध्ये पार पडणार होत्या. परंतु, देशात कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. तिसरा टप्पा 20-25 जुलैपर्यंत आयोजित करण्यात आला होता. तर चौथा टप्पा 26 ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात आला होता.
निकाल पाहण्यासाठी परीक्षांर्थींना सर्वात आधी अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर जाऊन होमपेज वर “JEE मेन 2021 पेपर 2 निकाल” या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर स्क्रीनवर नवीन लॉगिन विंडो दिसेल त्यात अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून 'सबमिट' वर क्लिक केल्यानंतर जेईई मेन निकाल 2021 पेपर 2 आपल्या स्क्रिनवर दिसेलनिकाल चेक करून डाऊनलोड करता येईल. जेईई मेन पेपर 2 निकालासोबत नॅटने विद्यार्थ्यांचे विषयानुरूप गुण, एकूण गुण आणि ऑल इंडिया रॅंक देखील जारी केली आहे.