जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशन शुल्कात 8 पटींची वाढ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : पंधरा वर्षांहून अधिक जुन्या वाहनांच्या नूतनीकरणाच्या शुल्कात केंद्र सरकारने 8 पट वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आगामी एप्रिल 2022 पासून जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण करण्यासाठी 5 हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ही रक्कम पूर्वीच्या तुलनेत 8 पट अधिक आहे. हा नवा नियम राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण धोरणाचाच एक भाग आहे. जुन्या वाहनांचं नुतनीकरणासाठी सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार, 15 वर्ष जुन्या गाड्यांच्या नुतनिकरणासाठी 600 ऐवजी 5 हजार रुपये आणि बाईक्ससाठी 300 ऐवजी 1000 रुपये, बस किंवा ट्रकसाठी 1500 रुपयांऐवजी 12,500 रुपयांचं शुल्क देणे आवश्यक आहे. परंतु, दिल्ली-एनसीआरमधील वाहनांच्या मालिकेवर केंद्र सरकारचा हा नवा नियम लागू असणार नाही. दरम्यान, दिल्लीत 10 वर्ष जुन्या डिझेलवर चालणारी वाहनं आणि 15 वर्ष जुनी पेट्रोलवर चालणाऱ्या वाहानांवर आधापासूनच प्रतिबंध लावण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सरकार द्वारे तयार करण्यात आलेल्या नियमांमध्ये रजिस्ट्रेशन कार्ड स्मार्ट कार्डप्रमाणे असेल. त्यासाठी 200 रुपयांचं अतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे. सरकारद्वारे तयार करण्यात आलेले हे नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहेत.