अवघ्या १० मिनिटांत शरद केळकरने बनवला इको फ्रेंडली बाप्पा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
बघता बघता तो दिवस जवळ आला ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय... लवकरच अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान होणार आहेत. बाप्पा आला म्हणजे सजावट, आनंदी वातावरण, नैवेद्य आणि मोदक हे आलेच. परंतु या आधी सर्वात पहिला विचार अनेकांच्या मनात येतो तो म्हणजे ‘यंदाच्या वर्षीचा माझा बाप्पा कसा असायला हवा?’ असाच विचार अभिनेता शरद केळकर याने पण केला.
दरवर्षी असलेला शरद केळकरचा उत्साह आणि आनंद यावर्षी दुप्पटपटीने वाढला आहे आणि त्याचे कारणही विशेष आहे. ते विशेष कारण असे की, पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा वापर करण्याचे शरदने ठरवले होते मात्र यावेळी त्याने स्वत:च्या हाताने त्याच्या घरी बाप्पाची इको फ्रेंडली मुर्ती बनवली आणि ती देखील फक्त १० मिनिटांतच. आहे की नाही हे विशेष कारण? १० मिनिटांमध्ये बाप्पाची मूर्ती बनवणं हे शक्य तरी आहे का, हा विचारच मुळात सोप्पा वाटत नाही, पण शरद केळकरने ते शक्य करुन दाखवलं.
दमदार आवाज आणि जबरदस्त अभिनय अशी शरद केळकरची ओळख, मात्र आता त्याच्यातील सुप्त गुण बाप्पाच्या निमित्ताने सर्वांना कळलाय. त्याच्या या कलाकारीमध्ये त्याला शिल्पकार, क्ले आर्टिस्ट शुभांकर कांबळेचं मार्गदर्शन लाभलं. शुभांकरने हँडमेड पेंटिग, शिल्पकला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. यापूर्वी त्याने सिनेमाचे हँडमेड पोस्टर बनवले होते आणि आता शरद केळकरसोबत अवघ्या १० मिनिटांमध्ये बनवलेली गणपतीची इको फ्रेंडली गणपती म्हणजे खरंच “कमालsss”!