शिरूरमध्ये १० व्हेंटिलेटर बेडचे कोविड हॉस्पिटल करण्याची मागणी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
पुणे : शिरूर शहरात १०० ऑक्सिजन बेड व १० व्हेंटिलेटर बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करावे, अशी मागणी शिरूर शहरातील शिरूर शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आय या विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे करण्यात आले आहे.याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार, शिरूर उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार शिरूर लैला शेख यांना देण्यात आले आहे. या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे शहराध्यक्ष ॲड. रवींद्र खांडरे, यांनी माहिती दिली आहे.
कोविड १९ ची दुसऱ्या लाटेत शिरूर शहराला मोठा फटका बसला असून, १ एप्रिल ते आजपर्यंत सरासरी १५ ते ३० पेशंट दररोज कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. साधारणपणे शहरात एका महिन्यात ५०० ते ९०० कोविड रुग्ण आढळून आलेले आहेत. ज्या प्रमाणात रुग्ण आढळतात त्या प्रमाणात त्यांना औषध व उपचार मिळत नाहीत. त्यांच्या विलगीकरणाची सोय केलेली आहे. परंतु रुग्णांना लागणारे ऑक्सिजन बेड फक्त ३० आहेत ते तोकडे पडतात. त्यामुळे शिरूर शहरातील अनेक लोकांना कोविड १९ च्या आजारामुळे वेळेवर ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्याने मृत्युमुखी पडावे लागलेले आहे.