शार्दूल ठाकूरचा डबल धमाका! ICC च्या टेस्ट रँकिंगमध्ये बॅटिंगसोबत बॉलिंगमध्येही आगेकूच!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नुकत्याच संपलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटीमधील रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये रँकिंगमध्ये सर्वाधिक सुधारणा झालेला भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर ठरला आहे! शार्दूल ठाकूरनं ओव्हलवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर शार्दूलनं केलेल्या याच कामगिरीच्या जोरावर त्यानं कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. शार्दूलसोबतच इंग्लंडचा फलंदाज ओली पोप यानं देखील क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
ICC नं नुकत्याच जाहीर केलेल्या Test Ranking मध्ये शार्दूल ठाकूरनं १३८व्या स्थानावरून फलंदाजीमध्ये थेट ७९व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ओव्हलच्या कसोटीमध्ये दोन्ही डावांमध्ये शार्दूल ठाकूरनं अर्धशतक झळकावून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचाच परिणाम म्हणून त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये सुधारणा झाली आहे. दुसरीकडे गोलंदाजीमधअये देखील शार्दूल ठाकूर यानं ५६ वरून ४९व्या स्थानी झेप घेतली आहे. ओव्हलमधील कसोटीमध्ये शार्दूलनं पहिल्या डावात एक तर दुसऱ्या डावात दोन बळी घेतले होते. दोन्ही डावांमध्ये मिळून शार्दूलनं २३ षटकांमध्ये फक्त ७६ धावा दिल्या होत्या.