कर्नाटकच्या विविध विषयांवर येडियुरप्पा आणि नड्डा यांच्यात चर्चा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मान्यवरांनी कर्नाटकच्या विविध विषयांवर चर्चा केली. बी एस येडियुरप्पा यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.
या संदर्भात ट्वीटरद्वारे बी एस येडियुरप्पा म्हणाले, " भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची नवी दिल्लीत भेट घेतली. पक्षाच्या सबलीकरणास तसेच 2023 कर्नाटक निवडणुकांवर चर्चा केली. "
या भेटीबाबत माध्यमांशी बोलताना बी एस येडियुरप्पा म्हणाले, " जगत प्रकाश नड्डा आणि मी कर्नाटकच्या विविध विषयांवर चर्चा केली. माझ्याबद्दल त्यांचा अभिप्राय -मत उत्तम आहे. राज्यात पक्षास पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी मी कार्यरत असेन ".
गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविषयी विविध चर्चा राज्यात सुरु आहेत. यावर बोलताना बी एस येडियुरप्पा म्हणाले की, राज्यात नेतृत्व बदलाचा प्रश्नच येत नसून त्या फक्त अफवा आहेत आणि अशा विषयात काहीही सत्य नाही.
हिंदुस्थान समाचार