दुर्गापूर दुर्घटनेतील मृतकांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतुन ६ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दुर्गापूर दुर्घटनेतील मृतकांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतुन ६ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

चंद्रपूर : दुर्गापूर दुर्घटनेतील मृतकांच्या कुटूंबियांना मुख्येमंत्री निधीतुन ६ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मृतकांच्या कुटूंबियांना सदर धनादेश सुपुर्द केला आहे. दुर्गापूर येथे १२ जुलै रोजी जनरेटर मधील गॅस गळतीमुळे कंत्राटदार रमेश लष्करे यांच्यासह कुटूंबातील सहा जणांचा दुर्देवी मुत्युमुखी झाल्याच्या घटनेतील मृतकांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतुन अर्थसहाय्य प्रदान करावे अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती.

दुर्गापूर येथील रहिवासी रमेश लष्करे यांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास घरातील जनरेटर सुरू केले होते. घरातील सर्व जण झोपलेले असताना जनरेटरचा धूर बाहेर न गेल्यााने गुदमरून कुटूंबातील रमेश लष्करे, अजय लष्करे, लखन लष्करे, कृष्णा लष्करे, माधुरी लष्करे, पुजा लष्करे या सहा जणांचा मृत्यु झाला होता. तातडीने मृतकांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतुन अर्थसहाय्य मिळावे यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून त्याचा पाठपुरावा केला .त्यानुसार सदर प्रकरणी ६ लाख रु चे अर्थसहाय्य मुख्यमंत्री निधीतुन मंजूर करण्यात आले आहे.आ. मुनगंटीवार यांनी आज लष्करे कुटुंबियांची भेट घेत ६ लाख रूपयांचा धनादेश सुपुर्द केला.