‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार ‘बेल बॉटम’
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि वाणी कपूरचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. लॉकडाउननंतर चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणारा ‘बेल बॉटम’ हा पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
बेल बॉटम हा चित्रपट १६ सप्टेंबर २०२१ पासून अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे चाहते आनंदी झाल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटाने चित्रपटगृहामध्ये देखील चांगली कमाई केली होती. ‘बेल बॉटम’ या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. करोना काळात ‘बेल बॉटम’च्या निर्मात्यांनी चित्रपटाला चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. तर अशा कठीण काळात चित्रपटाला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक सेलिब्रिटींनी निर्मात्यांचे आणि कलाकारांचे कौतुक केले होते.
अक्षयच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटात त्याच्यासोबत लारा दत्ता, वाणी कपूर आणि हुमा कुरैशी देखील आहे. हा चित्रपट १९ ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. तर या चित्रपटाची निर्मिती निर्माते जॅकी भग्नानी आणि दिपशिखा देशमुख यांनी केली आहे.