राज्यव्यापी लसीकरण अभियान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यव्यापी लसीकरण अभियान

लखनऊ,  : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावटात राज्यव्यापी लसीकरण अभियानासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांनी महत्वाची घोषणा केली.

ट्वीटरद्वारे नागरिकांना विशेषतः महिलांना आवाहन करीत योगी आदित्यनाथ  म्हणाले, " कोरोना महामारी पासून  मातृशक्तीची  सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी   उत्तर प्रदेश सरकारने सोमवार 7 जून पासून सर्व जिल्ह्यांमध्ये   'महिला विशेष ' लसीकरण केंद्र सुरु केले आहे. सर्व माता भगिनीं यथाशीघ्र लसीकरण करून घ्या. लस विजयाची."