'यास’ चक्रीवादळ: मनसुख मांडवीय यांनी घेतली आढावा बैठक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावटात ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देशातील पूर्व समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या महत्वाच्या बंदरांच्या सज्जतेचा आढावा घेतला. या बैठकीला, जहाजबांधणी, बंदरे आणि जलवाहतूक विभागाचे वरिष्ठ मंत्री आणि महत्वाच्या बंदर प्राधिकरणांचे अध्यक्ष उपस्थित होते.
या वादळामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी काय काय तयारी करण्यात आली आहे, याची माहिती संबंधित अध्यक्षांनी या बैठकीत दिली.
महत्वाच्या बंदरांचे आणि बंदरांवरील मालमत्तांचे या वादळात कमीतकमी नुकसान व्हावे, तसेच जीवहानी होऊ नये, अशी काळजी घेतली जावी, असे मांडवीय यांनी यावेळी सांगितले. गरज पडल्यास, या बंदरांच्या आसपास असलेल्या लोकांचीही मदत केली जावी, अशी सूचनाही त्यांनी केली. बंदरांच्या अध्यक्षांनी सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठीची सज्जता ठेवण्याचे आश्वासन या बैठकीत दिले.