महामुकाबल्याचा अखेरचा दिवस, विराट-पुजारा ठरवणार निकाल
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा (World Test Championship Final) आजचा अखेरचा दिवस आहे. पावसामुळे या सामन्यात बराच वेळ फुकट गेल्यामुळ सहाव्या राखीव दिवशी खेळ होणार आहे. या टेस्टच्या पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही, तर पाचव्या दिवशीही पावसामुळेच सामना एक तास उशीरा सुरू झाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही खराब प्रकाशामुळे संपूर्ण दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. सहाव्या दिवशी मात्र साऊथम्पटनमध्ये दिवसभर उन्ह असणार आहे, ज्यामुळे दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकतो.
LIVE SCORE पाहण्यासाठी क्लिक करा
पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 64/2 असा आहे, तसंच टीम इंडियाकडे 32 रनची आघाडी आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताला शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोन ओपनरच्या रुपात धक्के लागले. न्यूझीलंडच्या टीम साऊदीला या दोन्ही विकेट मिळाल्या. दिवसाअखेरीस चेतेश्वर पुजारा 12 रनवर तर विराट कोहली 8 रनवर खेळत आहे.
पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या बॉलरनी भेदक बॉलिंग केली. पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडचा 249 रनवर ऑल आऊट झाला, पण किवी टीमला महत्त्वाची अशी 32 रनची आघाडी घेतली. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर इशांत शर्माला 3 विकेट मिळाल्या. आर.अश्विनला 2 आणि जडेजाला 1 विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवेने सर्वाधिक 54 रन केले, तर कर्णधार केन विलियमसनने 49 रनची चिवट खेळी केली. काईल जेमिसन आणि टीम साऊदीने न्यूझीलंडला ही आघाडी मिळवून देण्यात मदत केली. जेमिसनने 16 बॉलमध्ये 21 रन तर टीम साऊदीने 30 रन केले.