राज्यात ८,९९२ नवे रुग्ण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : राज्यात दिवसभरात ८,९९२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर २०० जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी १० हजार ४५८ रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या एक लाख १२ हजार २३१आहे. गेल्या २४ तासात कोल्हापूर जिल्हा १५२५, सांगली ९३०, रायगड ४१२, सातारा १०८५, पुणे ग्रामीण ६९८ रुग्ण नव्याने आढळले. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्हा ४६, कोल्हापूर ३९, सांगली ११, मुंबई १३, रायगड १८, सातारा २४ जणांचा समावेश आहे.
मुंबईत रुग्णवाढीच्या दरात घसरण
मुंबईत शुक्रवारी ६०० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला. ५६६ रुग्ण करोनामुक्त झाले. उपचाराधीन रुग्णांची संख्या आठ हजाराच्या खाली गेली आहे. रुग्णवाढीचा दर आणखी खाली आला असून सध्या हा दर ०.०७ टक्के आहे. मुंबईत एकूण बाधितांची संख्या सात लाख २६ हजारांपुढे गेली आहे. करोना मृतांची एकूण संख्या १५,५९९ झाली आहे. आतापर्यंत सात लाखांहून अधिक म्हणजेच ९६ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ७,७३१ झाली आहे. शुक्रवारी ३९,०७५ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १.५३ टक्के जण बाधित आढळले. रुग्ण दुपटीचा कालावधीही ८९२ दिवसांवर गेला आहे.
ठाणे जिल्ह्यात ४७९ बाधित
ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ४७९ करोना रुग्ण आढळून आले, तर १४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ४७९ करोना रुग्णांपैकी नवी मुंबई १०९, कल्याण-डोंबिवली १०३, ठाणे १००, मीरा-भाईंदर ७२, ठाणे ग्रामीण ४२, बदलापूर २०, अंबरनाथ १८, उल्हासनगर १० आणि भिवंडीत पाच रुग्ण आढळून आले. तर ठाण्यात चार, नवी मुंबई दोन, कल्याण-डोंबिवलीत दोन, उल्हासनगर दोन, ठाणे ग्रामीण दोन, अंबरनाथ एक व बदलापूरमध्ये एकाचा मृत्यू झाला.