डॉ. गुलेरिया म्हणाले - पुढच्या 6 ते 8 आठवड्यांमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

डॉ. गुलेरिया म्हणाले - पुढच्या 6 ते 8 आठवड्यांमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) चे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर कोरोना गाइडलाइंसचे पालन केले नाही आणि बाजार किंवा पर्यटनस्थळांवरील गर्दी थांबवली नाही तर कोरोनाची तिसरी लाट केवळ 6-8 आठवड्यांमध्ये संपूर्ण देशावर अटॅक करु शकते.

डॉ. गुलेरियाने म्हटले की, आतापर्यंच्या रिसर्चमध्ये असे कोणतेही पुरावे मिळालेले नाही की, कोरोनाची तिसरी लाट प्रौढांपेक्षा लहान मुलांना प्रभावित करेल. यापूर्वी भारताच्या महामारी विशेषज्ञांनी पहिल्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली होती.

देशात एप्रिल आणि मे महिन्याच्या मध्यावधीत कोरोनाची दुसरी लाट भारतात पीकवर पोहोचली होती. या दरम्यान देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये विक्रमी वाढ नोंदवण्यात आली होती. जास्तीत जास्त राज्यांमध्ये या काळात ऑक्सिजनची कमतरता जाणवली. यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे केस कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

तिसरी लाट रोखण्याचे 4 उपाय

  1. भारतातील जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण करावे लागेल.
  2. लोकांना कोविड गाइडलाइन्सचे पालन करावे लागेल.
  3. अशा परीसरांची मॉनिटरिंग करावे लागेल, जेथे कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.
  4. जेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 5% पेक्षा जास्त आहे, तेथे कंटेनमेंट क्षेत्र घोषित करावे लागेल.

महाराष्ट्रात 2 ते 3 आठवड्यांच्या आत तिसरी लाट येण्याचा अंदाज
महाराष्ट्रात 1-2 महिन्यांच्या आत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट कोरोनाचा खतरनाक व्हेरिएंट डेल्टा प्लस (AY.1) मुळे येईल. राज्याच्या कोविड टास्क फोर्सने बुधवारी या महामारीच्या आढावा बैठकीमध्ये ही माहिती दिली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेडिकल टीम आणि इतर अधिकाऱ्यांना आवश्यक उपकरणांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले.