भारत आणि रशियन महासंघादरम्यान पोलाद निर्मितीसाठी सामंजस्य कराराला मान्यता
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि रशियन महासंघादरम्यान पोलाद निर्मितीसाठी उपयुक्त कोकिंग कोळशासंदर्भातील सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली.
या सामंजस्य करारामुळे संपूर्ण पोलाद क्षेत्राला फायदा होणार असून त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. यामुळे देशातील पोलादाची किंमत कमी व्हायला मदत होईल आणि समानता आणि समावेशकतेला चालना मिळेल.
भारत आणि रशिया यांच्यातील कोकींग कोळसा क्षेत्रातील सहकार्यासाठी या सामंजस्य करारामुळे एक संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध होईल. पोलाद क्षेत्रात भारत सरकार आणि रशियन सरकारदरम्यान सहकार्याला बळकटी देण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. कोकिंग कोळशाच्या स्रोतांमध्ये विविधता निर्माण करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या सहकार्याशी संबंधित कार्याचा यात समावेश आहे.