बिग बॉस फेम मराठी अभिनेत्रीला रेव्ह पार्टीतून अटक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
इगतपूरीमध्ये एका बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीत नाशिक ग्रामीण पोलिसांनी धाड घालून 22 जणांना ताब्यात घेतले आहे. या पार्टीमध्ये मराठी बिग बॉस फेम हीना पांचाळ या अभिनेत्रीसह 12 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी 6 तरुणी या बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री असल्याचे समोर आले आहे. इगतपुरीतील दोन खासगी बंगल्यांमध्ये अवैध पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार मानस हॉटेलजवळ असलेल्या स्काय ताज व्हिला येथे पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. तेथे 10 पुरुष, 12 महिला ड्रग्ज व हुक्क्याचे सेवन करताना आढळून आल्या. पोलिसांनी या 22 जणांना ताब्यात घेतले व त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात चित्रपटसृष्टीत काम करणाऱया सहा अभिनेत्री व मराठी 'बिग बॉस' फेम हीना पांचाळचा समावेश आहे. हीनानेही ड्रग्ज घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. या पार्टीसाठी त्यांना सहाय्य करणाऱया लोकांच्या संदर्भातही पोलिसांची कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती अधीक्षक सचिन पाटील यांनी व्हिडीओ क्लिपद्वारे दिली आहे.