‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बबीताच्या अडचणी वाढ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम बबीता म्हणजेच अभिनेत्री मुमुन दत्ताच्या अडचणी थांबण्याच नाव नाही. काही दिवसांपूर्वीच मुनमुनने जातीवाचक शब्दांचा उल्लेख करत अपमानजनक वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य मुनमुनला आता महागात पडलं आहे.
हरियाणामधील हांसी शरहात मुनमुनविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नॅशनल अलायंल फॉर दलित ह्यूमन राईटस् चे कार्यकर्ते रतज कलसन यांनी मुनमुन विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मुनमुनवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याने तिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशीतील विविध शहरांमध्ये तिच्याविरोधात गुन्हे दाखल होत आहेत.
जालंधरमध्ये देखील दलित संघटनांनी एकत्र येत मुनमुनविरोधत गुन्हा दाखल केला असून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केलीय. मुनमुनवर अजामीनपात्र गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाल्याने अटक झाल्यास तिला जामीन मिळू शकत नाही. काही दिवसांपूर्वी मुनमुनने सोशल मीडियावर एक व्हि़डीओ शेअर केला होता. या व्हिडीओमुळे या संपूर्ण प्रकरणाला तोंड फुटलं.
मुनमुने शेअर केलेल्या व्हिडीओत तिने जातिवाचक शब्दांचा वापर करत समाजातील ठराविक समूहाचा अपमान केला होता. यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. या व्हिडीओत ती म्हणाली, “‘मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचं आहे. मला ** सारखं दिसायचे नाही’ . हा व्हि़डीओ पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त होऊ लागला.