फेरीवाल्याकडून मनपाच्या सहाय्यक आयुक्तांसह अंगरक्षकावर चाकू हल्ला, हल्लेखोराला अटक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
ठाणे: ठाणे येथील कासावडवली भागातील बाजार परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आहेत, तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या अंगरक्षकावर देखील हल्ला झाला असून त्याचे देखील एक बोट कापले गेले आहे. दोघांवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हल्लेखोर फेरीवाला अमरजीत यादव याच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याविषयी पुढील तपास सुरू आहे.