नागपूर : पोलीस तलावाचा विस्तारित प्रस्ताव तयार करा : महापौर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी पोलीस लाईन टाकळी येथे तलावाच्या कामाचे निरीक्षण
केले. केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी या तलावाच्या सौंदर्यीकरण व विकास
कार्यासाठी रु ५० लाखाचे प्रावधान खासदार निधीतून केले आहे. नागपूर महानगर पालिकेच्या माध्यमातून
विकास कार्याची सुरुवात झालेली आहे.
महापौरांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या खासदार निधीतून तलावाच्या समोरील भागात
आय ब्लॉक लावणे, सुरक्षेच्या दृष्टीनी समोरील भागात गेट लावणे, तलावाच्या सभोवतलाच्या पाळीचे
संताळीकरण करणे, कचरा, झुडपांची सफाई करणे, पाळीवर ३ मीटर रुंदीच्या पादचारी मार्गाचा विकास
करणे , तलावातील गाळ काढणे व स्वच्छ करणे, दक्षिण पश्चिम भागात शौचालय बांधकाम तसेच
तलावाच्या पाय-यांची दुरुस्ती इत्यादी कामे करणे अशा प्रकारचे कार्यक्रम प्रस्तावित आहेत. यावेळी
महापौरांनी मनपा अधिकाऱ्यांना पोलीस विभाग मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विकास कार्य व
सौदर्यीकरण करण्यासाठी विस्तारित प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच पानकांदा काढून तलाव
सौंदर्यीकरणासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही दिले. तिवारी म्हणाले की, विस्तारित प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर
नितीन गडकरींशी चर्चा करून आवश्यक निधीची मागणी केली जाईल.