पुण्यात लहान मुलांचं पहिलं कोविड सेंटर तयार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
पुणे : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात हाहाकार पसरला आहे. अशात आता तिसऱ्या लाटेची शक्यताही
वर्तवण्यात येत आहे. इतकंच नाहीतर तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात धोका असणार अशी
माहिती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे राज्यात तिसऱ्या लाटेसाठी आधीपासूनच तयारी करण्यात
आली आहे.पुण्यामध्ये करोनाचा धोका रोखण्यासाठी लहान मुलांचं पहिलं कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे.
याचा एक खास व्हिडिओदेखील समोर आला आहे. यामध्ये लहान मुलांसाठी पक्षी, प्राण्यांची चित्रे, खेळणी, लहान
मुलांची गाणी अशा खास सुविधा करण्यात आल्या आहेत.पुण्यातील बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटर इथे लहान
मुलांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका आणि शिला राज साळवे फाउंडेशनच्या
माध्यमातून व नगरसेवक अविनाश साळवे यांच्या संकल्पनेतून हे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यासाठी
आजपासून रुग्णांना प्रवेश चालू करण्यात येणार आहे अशी माहिती साळवे यांनी दिली.