दिल्लीत करोनासोबतच ‘ब्लॅक फंगस’चा कहर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : कोरोना साथरोगामुळे दिल्लीची जनता त्राही भगवान झाली असतानाच शहरात ‘ब्लॅक फंगस’चे संकट उभे ठाकले आहे. करोनामुळे ‘म्यूकोरमायसिस’ प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आलेय. या आजारामुळे डोळे, गळा आणि नाक यांना इजा पोहोचण्याची शक्यता आहे. म्यूकोरमायसिस एक करोनामुळे होणारे फंगल संक्रमण आहे.
यासंदर्भात बोलताना सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, करोनानंतर होणाऱ्या फंगल संक्रमणात वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसात म्यूकोरमायसिस पीडित 6 रुग्ण भरती झाले आहेत. गेल्या वर्षी या संक्रमणामुळे मृत्यू दरही अधिक होता. यामुळे कित्येक लोकांना अंधत्व आले होते. तसेच नाक आणइ गळ्याचे हाड गळून गेले होते. मधुमेह असलेल्या करोना रुग्णांवर स्टेरॉईडचा उपयोग काळजीपूर्वक करावा लागतो. कारण त्यामुळे ब्लॅक फंगस होण्याची शक्यता असते. ब्लॅक फंगसची लक्षण करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. खासकरून मधुमेह, किडनी, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांनी पीडित लोकांमध्ये ही समस्या अधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.