'अॅपल'चा 5जी सेगमेंट तडका यशस्वी करणारे 5 घटक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
अॅपल’ने 2020 च्या शेवटच्या तिमाहीत आपल्या 5जी-पॅकिंग आयफोन 12च्या यशासह जोरदार मुसंडी मारली. कंपनीच्या महसुलात 21% ने वाढ झाली आहे. आयफोन 12 या 5जी तंत्रज्ञान असलेल्या अॅपलच्या पहिल्या प्रॉडक्टच्या अमेरिकीतील विक्रीत 56% वाटा नोंदवण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन निश्चितच रेकॉर्ड ब्रेक विक्रीतील सुसाट पळणारा तगडा गडी ठरला.
अॅपलच्या या बेफाम यशासाठी काही घटक जबाबदार ठरले. त्यापैकी एक म्हणजे लोकांनी या अपग्रेडवर पटापट उड्या घेत मागणीचा आलेख चढा ठेवला. आता अॅपल’ने या खेळात शिरकाव केला म्हटल्यावर दिवसेंदिवस 5G smartphone (5जी स्मार्टफोन) च्या चर्चेला उधाण आले आहे.
ही यशोगाथा नेमकी आहे तरी काय ते सविस्तर जाणून घेऊ...
बाजारावर विस्तारीत ताबा
इतर 5जी प्रस्तावांचे अस्तित्व केवळ प्रादेशिक स्तरावर मर्यादित असताना अॅपल’ने बाजारावर विस्तारीत ताबा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले. चीन आणि जपानमध्ये Apple mobiles ची मागणी काहीशी अधिक बळकट आहे, या देशांसह 140 हून अधिक देशांत अॅपल उपलब्ध आहे.
त्याशिवाय, व्यापारातील विपणन धोरण आणि अमर्यादित योजनांसह आयफोन 12 च्या प्रोमोशनने विक्रीस हातभार लावला. याच धोरणाने एकट्या ऑक्टोबर महिन्यातच एक-तृतियांश विक्रीची नोंद झाली.
मिलीमीटर’ची लाट- सक्षम स्मार्टफोन
अलीकडे बाजारात आलेले आयफोन हे मिलीमीटर लाट म्हणजेच एमएम-वेव्हच्या जोरावर अधिक सशक्त झाले. अल्प-टप्प्याच्या, हाय-फ्रिक्वेन्सी नेटवर्क टेक्नोलॉजीने तुम्हाला 7 जीबीपीएसपर्यंतचा डेटा डाऊनलोड आणि 3 जीबीपीएसच्या डेटा अपलोड करण्याची क्षमता प्रदान केली. या एमएम-वेव्ह सज्ज 5जी स्मार्टफोनने मोठी लोकप्रियता मिळवली, जी ऑक्टोबर महिन्यात 12%पर्यंत वधारली.
5जी क्षमतेच्या दृष्टीने पुरेपूर साजेशा ठरलेल्या एमएम-वेव्हने आयफोनला 5जी अनलॉक करण्यासाठी खऱ्या अर्थाने क्षमता प्रदान केली. त्याशिवाय, एआर आणि व्हीआर सेगमेंट’मध्ये एमएम-वेव्हच्या ताकदीला आणखखी चालना देण्याची अॅपलची योजना आहे.
स्मार्ट डेटा मोड
अॅपल कायमच आपल्या ग्राहकांचे म्हणणे आपुलकीने आणि पद्धतशीररित्या ऐकत असते. आधीच्या 5जी फोनची बॅटरी लवकर संपत असल्याची, तसेच तो जास्त गरम होत असल्याची तक्रार आली. त्यावेळी अॅपलने स्मार्ट डेटा मोड नावाची इंटेलिजन्ट स्विचिंग सिस्टीम आणली.
या मॉडेलमध्ये आकर्षक वैशिष्ट्य आहे, जे फोनमधील डेटा फ्लोचे परीक्षण करते. ग्राहक 4जी वापरत असताना त्याला सुरळीत अनुभव मिळत होता किंवा 5जी वापरताना जास्तीचा ताण येतो आहे, हे या वैशिष्ट्यातून निश्चित करण्यात येते. त्यामुळे 5जी स्मार्टफोन गरज असताना त्या नेटवर्कवर जाऊन बॅटरीची शक्ती वाचवतात.